

Stock Market Recommendations
esakal
सिद्धार्थ खेमका मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लि.
सध्याच्या अस्थिर वातावरणात शेअर बाजारात तीव्र चढ-उतार होत आहेत. घसरणीत खरेदीची संधी असली, तरी नेमके कोणते शेअर घ्यावेत आणि कधी घ्यावेत, असा संभ्रम गुंतवणूकदारांच्या मनात असतो. चांगल्या शेअरची निवड अतिशय महत्त्वाची असते. यासाठी काही शेअरची शिफारस येथे केली आहे.
(उद्दिष्टपूर्तीचा अपेक्षित कालावधी : एक वर्ष)
कमिन्स (उद्दिष्ट : रु. ५५००)
पायाभूत सुविधा, रिअल इस्टेट, निर्मिती, डाटा सेंटर, हॉटेल व हॉस्पिटल या क्षेत्रांकडून कमिन्स इंडियाच्या वीज जनित्रांना भक्कम मागणी असल्याने तिचे उत्पन्न व नफ्याचे प्रमाण यातही वाढ दिसत आहे. अर्थवर्ष २५ ते २८ या काळात कंपनीचा महसूल/व्याज, कर, घसारा व कर्जमाफीपूर्व उत्पन्न/निव्वळ नफा यांचा चक्रवाढ वार्षिक विकासदर अनुक्रमे १७ टक्के, १९ टक्के व १९ टक्के राहण्याचा अंदाज आहे आणि कामकाजी लाभ, सुधारित औद्योगिक मागणी, उच्च वितरण व निर्यात यामुळे उत्पन्नाचे प्रमाण तर सातत्याने २१ टक्क्यांवर राहील, असे खात्रीने वाटते.
स्टेट बँक (उद्दिष्ट : रु. १३००)
स्टेट बँकेच्या सर्वांत लक्षणीय परिवर्तनामागे तिचा मालमत्ता दर्जा कारणीभूत आहे. अर्थवर्ष २६ च्या तिसऱ्या तिमाहीत ग्रॉस एनपीए गुणोत्तर १.५७ टक्क्यांपर्यंत, तर नेट एनपीए गुणोत्तर ०.३९ टक्क्यांपर्यंत कमी झाले असून, ही गेल्या २० वर्षांतील सर्वांत कमी पातळी आहे. पत खर्च केवळ ०.२९ टक्के असून, प्रोव्हिजन कव्हरेज रेशो जबरदस्त म्हणजे ७५.५ टक्के आहे. बँकेचा ताळेबंद स्पर्धकांच्या तुलनेत उत्तम व भक्कम आहे. रिटेल, छोटे व मध्यम उद्योग, कृषी या क्षेत्रांचे बँकिंग भक्कम असून, कंपनी कर्जपुरवठ्यात लक्षणीय सुधारणा दिसत आहे. ही बँक साधारणतः २०.७ टक्के भांडवली परतावा आणि १.२ टक्के मालमत्ता परतावा देत आहे.