

सुनंदन लेले
sdlele3@gmail.com
पहिल्यांदा २००८ मध्ये आयपीएल स्पर्धा भरवली गेली, तेव्हापासून ते आत्तापर्यंत संघमालकांना परदेशी प्रशिक्षकांची ओढ का आहे, हे मला पडलेले मोठे कोडे आहे. चालू आयपीएल स्पर्धेतील संघांकडे नजर टाकली तरी १० पैकी चार संघांचे प्रशिक्षक परदेशी दिसतात. प्रशिक्षक परदेशी असण्याला माझा विरोध नाहीये; पण सातत्याने अपयशी ठरलेल्या प्रशिक्षकांना हा नाही तर तो संघ परत आपला प्रशिक्षक म्हणून नेमतो हे बघून आश्चर्य नक्की वाटते.
काही ख्यातनाम माजी खेळाडू दरवर्षी नव्या संघांना मार्गदर्शन करताना बघून थक्क व्हायला होते आणि अर्थातच त्यांच्या सोबत त्यांच्या खास मर्जीतील खेळाडू त्यांच्या संघात हमखास सामावून घेतले जातात ही गोष्ट आपल्याला दिसते मग ती संघ मालकांना कशी कळत नाही, हे कोडे पडते.