How much money needed to become professional cricketer India
esakal
How much money needed to become professional cricketer India: बिहारमधून वैभव सूर्यवंशी आला... विदर्भच्या प्रफुल हिंगेने आयपीएलचे मैदान गाजवले... बिहारचा साकिब हुसैन SRH कडून चमकला... राजस्थानच्या मुकुल चौधरीचीही चर्चा आहेच.. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये दरवर्षी अशा अनेक खेळाडूंची चर्चा होते आणि त्यांचा प्रवास हा अनेक युवकांना प्रेरणादायी ठरतो... यांना जमलं म्हणजे आम्हालाही जमेलच... असा विश्वास युवकांमध्ये निर्माण होतो...
९० किड्सना सचिन तेंडुलकरने अशी भुरळ पाडली होती आणि अनेकांनी क्रिकेटपटू बनण्याचं स्वप्न बाळगलं होतं.. तेव्हा काही जणं म्हणायचे की, या सचिनने अख्खी पिढी बर्बाद केली... आताही आयपीएलमधील हे स्टार तेच करत आहेत.. फक्त सचिनच्या काळातली स्पर्धा अन् आताची यात जमीनआसमानाचा फरक आहे... या संदर्भात मुंबईच्या एस पी ग्रुप क्रिकेट अकादमीचे प्रशिक्षक संगम लाड यांच्याशी सकाळ + ने मारलेल्या गप्पा...