Premium|Iran Geopolitics : अमेरिका-इस्राईलच्या दबावातही इराण ठाम; पश्चिम आशियाच्या राजकारणाला नवे वळण?

Iran Geopolitics and West Asia : १९७९च्या इस्लामिक क्रांतीनंतर इराणने निर्माण केलेली स्वतंत्र राजकीय व्यवस्था, अमेरिका-इस्राईलशी संघर्ष, ऑटोमन साम्राज्याचा इतिहास आणि पश्चिम आशियातील बदलती भूराजकीय समीकरणे.
Iran Geopolitics

Iran Geopolitics

esakal

Updated on: 

अमीर अली-amirali.jnu@gmail.com

अमेरिकेच्या दीर्घकालीन आणि व्यापक हस्तक्षेपाविरोधात सातत्याने संघर्ष करताना पश्चिम आशियाची नव्याने व्याख्या करण्याची क्षमता असलेला इराण देश एक भूराजकीय विसंगती आहे. पश्चिम आशियातील अमेरिकाप्रणीत सत्ताव्यवस्थेला आव्हान देत इराणने एक स्वतंत्र सत्ताकेंद्र म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे. इराणकडे केवळ संघर्षग्रस्त राष्ट्र म्हणून नव्हे; तर बदलत्या जागतिक व्यवस्थेतील एक महत्त्वाचा भूराजकीय घटक म्हणून पाहणे आवश्यक आहे.

पश्चिम आशियातील इराणची भूराजकीय विसंगती ही त्यांच्या अरबेतर पर्शियन वारसा आणि शिया इस्लामी रचनेत दडलेली आहे. इतिहासात डोकावले तर संपूर्ण पश्चिम आशियावर अरब देश आणि सुन्नी इस्लामचे वर्चस्व राहिल्याचे दिसते. या प्रदेशातील मुबलक तेलसंपत्तीमुळे अनेक देशांचा कल व्यापारी दृष्टिकोनात अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांकडे झुकला. त्यामुळे या भागातील बहुतांश देश पाश्चिमात्यांचे घनिष्ठ मित्र बनले. १९७९ मध्ये इराणचे तत्कालीन सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांच्या नेतृत्वात झालेल्या इस्लामिक क्रांतीत शाह मोहम्मद रझा पहलवी यांची सत्ता उलथवण्यापर्यंत इराणदेखील अमेरिकेचा एक अत्यंत महत्त्वाचा मित्रदेश होता. इस्लामिक क्रांतीने धर्मसत्ताक व्यवस्था आणि प्लेटोच्या राजकीय तत्त्वज्ञानाचा मिलाफ असलेली एक आगळीवेगळी राज्यघटना आणि शासनप्रणाली निर्माण केली. इराणच्या इस्लामिक प्रजासत्ताकमधील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे प्लेटोनिक ‘फिलॉसॉफर किंग’च्या धर्तीवर असलेली ‘विलायत-ए-फकीह’ (धार्मिक न्यायशास्त्रज्ञांचे संरक्षक मंडळ) ही व्यवस्था. या अभूतपूर्व घटनात्मक रचनेमुळे इराणच्या राजकीय व्यवस्थेला आंतरिक स्थिरता लाभली. ती इतकी भक्कम होती, की अगदी अमेरिका व इस्राईललादेखील २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सुरू केलेल्या युद्धात ती उलथवून टाकणे अत्यंत कठीण किंबहुना अशक्यप्राय ठरले. अमेरिकेने सुरू केलेल्या मोठ्या लष्करी कारवाया आणि संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणची ही स्थिरता अधिक प्रकर्षाने अधोरेखित झाली. अमेरिका-इस्राईलविरुद्धच्या या युद्धात इराणचा सहजासहजी पराभव होणे अशक्य आहे. भीषण हल्ल्यानंतरही इराणने माघार घेतलेली नाही आणि आपल्या भूमिकेवर तो ठाम आहे.

इराणची हीच भूमिका पश्चिम आशियाच्या नव्या भूराजकीय संरचनेचा मुख्य आधारस्तंभ ठरण्याची दाट शक्यता आहे. ती २०व्या शतकातील कालबाह्य व्यवस्थेची जागा घेईल. त्या वेळी पश्चिम आशियाची जडणघडण ही प्रामुख्याने तेलसंपत्तीचा शोध आणि त्याच काळात झालेल्या ऑटोमन साम्राज्याच्या पतनातून झाली होती. अधःपतन झालेल्या महाकाय साम्राज्याच्या विभाजनातून त्या वेळी अनेक देशांची निर्मिती झाली. या देशांचा प्रभाव २०व्या आणि पुढे २१व्या शतकातही कायम राहिला. ऑटोमन साम्राज्यात अनेक प्रदेश ब्रिटन आणि फ्रान्ससारख्या पाश्चिमात्य वसाहतवादी देशांनी आपापसांत वाटून घेतले. त्यानुसार लेबनॉन आणि सीरियावर फ्रान्सने, तर इराक आणि पॅलेस्टाईनवर ब्रिटनने ताबा मिळवला. १९१६च्या ‘सायक्स-पिको’ करारानुसार झालेल्या विभाजनाला १९१७ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ब्रिटिश सरकारच्या ‘बाल्फोर जाहीरनाम्या’ने मान्यता दिली. त्यातून पुढे इस्राईलच्या निर्मितीचा पाया घातला गेला. पश्चिम आशियात नव्याने उदयास आलेल्या या देशांच्या सीमा जणू वाळूवर ओढलेल्या रेषांइतक्याच अस्थिर होत्या. सध्या या भागात सुरू असलेल्या भूराजकीय घडामोडींमुळे पश्चिम आशियाचा जुना नकाशा नव्याने रेखाटला जाण्याची शक्यता अधिक अधोरेखित होत आहे.

ऑटोमन साम्राज्यातून उदयास आलेले दोन महत्त्वाचे देश म्हणजे तुर्किये आणि सौदी अरेबिया. हे दोन्ही देश समकालीन पश्चिम आशियातील अत्यंत शक्तिशाली आणि निर्णायक देश आहेत. तुर्किये आज खऱ्या अर्थाने ऑटोमन परंपरेचा वारसा नव्या स्वरूपात पुढे नेत आहे. दीर्घकाळापासून सत्तेत असलेले प्रभावशाली नेते रेसेप तय्यिप एर्दोगान यांनी आपल्या ‘नव-ऑटोमनवादी’ धोरणांद्वारे हा ऐतिहासिक वारसा जपला आहे. दुसरीकडे, सौदी अरेबियाचा उदय हा सौद राजघराण्याची सत्ता आणि वहाबी धार्मिक परंपरा यांच्या ऐतिहासिक संयोगातून झाला. त्या दृष्टिकोनातून पाहिल्यास सौदी अरेबिया हे आधुनिक, केमालवादी आणि जाणीवपूर्वक धर्मनिरपेक्ष राहिलेल्या तुर्कियेच्या अगदी विरोधी टोक आहे. ऑटोमन साम्राज्याच्या पतनानंतर १९२३ मध्ये आधुनिक तुर्किये प्रजासत्ताकची स्थापना झाली; त्यानंतर सुमारे एका दशकाने म्हणजेच सप्टेंबर १९३२ मध्ये सौदी अरेबियाची औपचारिक निर्मिती झाली. ही दोन्ही राष्ट्रे पाश्चिमात्य देशांची महत्त्वाची मित्रराष्ट्रे राहिली आहेत. सौदी अरेबियाने आपली अफाट तेलसंपत्ती अमेरिकेच्या नेतृत्वातील भांडवली जगासाठी खुली केली; तर तुर्कियेने सुरुवातीपासूनच युरोपीय प्रवाहाशी एकरूप होण्याची प्रबळ केमालवादी आकांक्षा बाळगली. १९५२ मध्ये नाटोचा सदस्य झाल्यानंतर तुर्किये अनेक दशके पाश्चिमात्य जगाचा अविभाज्य सदस्य राहिला.

इराणचे वेगळेपण आणि विसंगती येथेच निर्णायक ठरते. इराण १९व्या शतकापासून रशिया आणि ग्रेट ब्रिटनमधील साम्राज्यवादी ‘ग्रेट गेम’च्या केंद्रस्थानी राहिला. पश्चिम आशियात इराणचे भौगोलिक स्थान महत्त्वाचे असून, तेथूनच भारतीय उपखंडाकडे जाण्याचा मार्ग जातो. हाच मार्ग ब्रिटनच्या साम्राज्यवादी धोरणासाठी महत्त्वाचा होता. त्याचवेळी इराणच्या उत्तरेकडील कॅस्पियन समुद्रावर रशियाचे; तर देशाच्या नैर्ऋत्येकडील पर्शियन आखातावर ब्रिटनच्या नौदलाचे वर्चस्व होते.

Loading content, please wait...