

financial base for decentralization
esakal
डॉ. संतोष दास्ताने
स्थानिक स्वराज्य संस्था केवळ कायद्याच्या तरतुदी आणि प्रशासकीय उतरंड यांनी सबल होणार नाहीत, तर त्यांना आर्थिक-वित्तीय बळ देणे महत्त्वाचे आहे. प्रशासन आणि वैधानिक आघाडीवर विकेंद्रीकरण आणि वित्तीय मुद्द्यांवर केंद्रीकरण अशी विसंगती सध्या दिसून येत आहे.
भा रतातील संघराज्यव्यवस्था हा आपल्या घटनेत अभिप्रेत असलेल्या मूलभूत संरचनेचा एक अभिन्न भाग आहे. ही संघराज्य व्यवस्था जपणे, तिचा कोणत्याही प्रकारे संकोच होऊ न देणे ही आपली घटनात्मक आणि नैतिक जबाबदारी आहे. देशातील प्रशासकीय आणि घटनात्मक व्यवस्था केंद्राकडे झुकणारी असली तरी राज्यांना रास्त महत्त्व देणे, त्यांना विकासप्रक्रियेत सामावून घेणे, त्यांच्या विकासासाठी प्रकल्प हाती घेणे याचे आवर्जून प्रयत्न झालेले दिसतात. सत्तेचे, प्रशासनाचे, निर्णयप्रक्रियेचे विकेंद्रीकरण व्हावे, यासाठी ७३ आणि ७४ क्रमांकाच्या घटनात्मक सुधारणा १९९३ मध्ये अंमलात आल्या.