

Gram Panchayat Revenue
esakal
निवडणूक प्रक्रियेद्वारे निवडल्या जाणाऱ्या गावपातळीवरील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे - ग्रामपंचायती. या नागरी संस्था पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्त्यावरील प्रकाश व्यवस्था अशा सेवा पुरवण्याची जबाबदारी सांभाळतात. या सेवांसाठी निधी उभारण्यासाठी त्या दोन मार्ग अवलंबू शकतात. मालमत्ता कर, पाणीपट्टी, बाजार शुल्क आदी स्थानिक करांच्या माध्यमातून स्वतः उत्पन्न (स्वतःचे महसूल स्त्रोत) वाढवणे किंवा राज्य आणि केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानांवर अवलंबून राहणे, हे दोन मार्ग ग्रामपंचायतींसमोर उपलब्ध आहेत.