
Jane Goodall Chimpanzee
esakal
डॉ. प्रदीपकुमार माने
प्रख्यात जीवशास्त्रज्ञ जेन गुडाल या दोन दिवसापूर्वी आपणाला सोडून गेल्या. जंगलामध्ये जाऊन चिंपांझीसारख्या जीवावर प्रयोग करणाऱ्या त्या पहिल्या महिला शास्त्रज्ञ. चिंपांझी मानवाला सर्वात जास्त जवळचे आहेत, हे सिद्ध करण्यासाठी ज्या शास्त्रज्ञांनी वैज्ञानिक क्षेत्रात पराकाष्ठा केली त्यात जेन गुडाल अग्रक्रमाने येतात.
सं पूर्ण सजीवसृष्टीकडे आणि पर्यायाने मानवजातीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणाऱ्या जीवशास्त्रज्ञ जेन गुडाल या दोन दिवसापूर्वी आपणाला सोडून गेल्या. चार्लस डार्विन यांनी निर्माण केलेली जैविक उत्क्रांतीची ही पायवाट जेन गुडालसारख्या काही क्रांतिकारी शास्त्रज्ञांमुळे एका महामार्गात परिवर्तीत झाली. गुडाल यांनी आपल्या चिंपांझीवरील संशोधनाने आपण ‘डार्विनकन्या’ आहोत हे सिद्ध करून दाखवले.