Premium| Jasprit Bumrah bowling : एकमेव आणि अद्वितीय

Indian Fast Bowlers : जसप्रीत बुमराची अष्टपैलू दहशत आणि विस्मयकारक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. फलंदाजांच्या मनात धडकी भरवणारा हा 'यॉर्कर किंग' सध्या जागतिक क्रिकेटमध्ये भारतीय विजयाचा मुख्य शिल्पकार ठरला आहे.
Jasprit Bumrah bowling

Jasprit Bumrah bowling

esakal

Updated on

सुनंदन लेले - sdlele3@gmail.com

भारतीय संघाच्या कसोटी, एकदिवसीय किंवा टी-२० कोणत्याही क्रिकेट प्रकारात जी दहशत जसप्रीत बुमराची दिसते, ती कोणाचीच बघायला मिळालेली नाही. सुरू असलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने अंतिम सामन्यात मारलेल्या धडकेची कहाणी बुमराशिवाय पूर्ण होणारच नाही.

गेल्या तीन दशकांपासून जास्त क्रिकेट सामन्यांचे वार्तांकन मी करत आलो आहे. सुरुवातीला सुनील गावसकरांच्या खेळण्याचा शेवटचा काळ बघितला. चेन्नईमधील चेपॉक मैदानावर भयानक फिरकी घेणाऱ्या खेळपट्टीवर पाकिस्तानच्या खूप निष्णात गोलंदाजांसमोर कमाल खेळी उभारताना बघितले. गावसकर निवृत्त होत असताना पोटात गोळा आला होता की भारतीय फलंदाजीचे आता काय होणार? क्रिकेट देवाची कृपा होती की काही काळातच सचिन तेंडुलकर नावारूपाला आला. थोड्या कालांतरानंतर सचिनला राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण येऊन मिळाले. अर्थातच सेहवागसारखा कसोटीतील आणि युवराज सिंगसारखा एकदिवसीय क्रिकेटमधला सामना जिंकून देणारा फलंदाज लाभला. पुढील काळात महेंद्र सिंह धोनीने तीनही क्रिकेट प्रकारात ठसा उमटवला. याचाच अर्थ असा आहे, भारतीय फलंदाजी कधीच पोरकी झाली नाही.

Jasprit Bumrah bowling
Morne Morkel: चर्चा अन् चिंताही नाही; मॉर्ने मॉर्केल, अभिषेक शर्माची संघ व्यवस्थापनाकडून पाठराखण
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com