

Jawaharlal Nehru Archive online documents
esakal
पंडित जवाहरलाल नेहरू... हे नाव आजही सर्वसामान्यांना भुरळ घालते. हल्ली समाजमाध्यमांच्या युगात ते कधी टीकेचा विषय ठरतात, तर कधी कौतुकाचा. पण स्वतंत्र भारताची पायाभरणी करणाऱ्या या नेत्याला आपापल्यापरीने समजून घेण्याचा अनेकांचा प्रयत्न सतत सुरू असतो. अशांच्या अभ्यासाचा एक मुख्य आधार म्हणजे नेहरूंच्या निवडक साहित्यसंपेदेचे शंभर खंड. हे विचारसंचित ‘नेहरू अर्काइव्हच्या (https://nehruarchive.in) माध्यमातून ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले आहे. इतिहासकार माधवन के. पलत यांनी हा प्रकल्प पूर्णत्वास नेला. त्यांच्याशी गोपाळ कुलकर्णी यांनी साधलेला संवाद.