

Jim Simons Quant Investing
esakal
विक्रम अवसरीकर - vikram.awsarikar@gmail.com
वॉल स्ट्रीट जर्नलचे पत्रकार ग्रेगरी झुकरमन यांनी लिहिलेल्या ‘द मॅन हू सॉल्व्हड द मार्केट’ या पुस्तकातून जिम सिमन्स आणि ‘क्वांट’ गुंतवणुकीच्या विलक्षण जगाची ओळख होते. या जगाची रंजक माहिती देताना, सर्वसामान्य गुंतवणूकदाराने कोणता धडा घ्यावा, याचीही तितकीच महत्त्वाची शिकवण छोटू आणि धनंजयराव यांच्या संवादातून मिळते...
छोटू विचारात पडला होता. धनंजयरावांना तपासात मदत करताना तो नेहमीच छोट्या-छोट्या कल्पना सुचवत असे; पण यावेळी तो काहीसा जास्तच गंभीर दिसत होता. धनंजयरावांनी त्याच्याकडे मिश्कील नजरेने पाहिले आणि पुन्हा आपल्या वाचनात गढून गेले. खरं तर छोटू कधी बोलायला सुरुवात करतो, याचीच ते वाट पाहत होते. हा त्यांच्यातला एक जुना खेळ होता, जणू काही जो आधी बोलायला सुरुवात करेल, तो हरला!
शेवटी सुरुवात छोटूनेच केली.
‘‘काय करावं, काही समजत नाही बुवा.’’
पहिल्याच वाक्यातील शरणागती ऐकून धनंजयरावांना हसू आवरले नाही. ते याचीच वाट पाहत होते. नेहमीप्रमाणे थोडा भाव खात ते म्हणाले, ‘‘काय रे बाबा, काय झालं?’’