EQ is Important at workplace
Esakal
एखादी व्यक्ती कामात प्रचंड हुशार असेल, समोर आलेल्या अडचणी सहजपणे सोडवत असेल तंत्रज्ञान जसं नवं येईल तसं ते शिकून घेण्यात, कामात सतत नाविन्य आणत असेल हे सगळं जरी असलं तरी केवळ या ज्ञानावर त्या व्यक्तीची निवड करणे अर्धवट ठरू शकते असं थेट एका जागतिक अहवालात म्हटले आहे.
माणसांना कामाच्या ठिकाणी लागणाऱ्या आकलनक्षमता म्हणजेच cognitive skills असतात. थोडक्यात सांगायचं झालं तर त्यांचा आयक्यू हा महत्त्वाचा घटक आहेच. पण जर त्यांच्याकडे EQ म्हणजेच Emotional Quotient नसेल किंवा कमी असेल तर थेट त्या व्यक्तीच्या कामावर याचा परिणाम होत असल्याचं सर्व्हेक्षणातून समोर आलं आहे.
Organization for Economic Co-operation and Development या जागतिक स्तरावरील संस्थेने ३० हून अधिक देशांच्या कर्मचाऱ्यांचा अभ्यास करून याबाबतची निरीक्षणं मांडली आहेत. यामध्ये त्यांनी व्यक्तीकडे cognitive skills सोबतच कोणती Social and Emotional skills असायला हवीत याविषयी सांगितले आहे. तसेच त्यांच्या अभ्यासाची निरीक्षणे देखील नोंदवली आहेत. एखादी व्यक्ती अधिक सुखी आणि समाधानी असण्याचा संबंधही त्याच्या या स्किल्सशी कसा आहे हेही या अभ्यासात सांगितले आहे.
सकाळ प्लसच्या या लेखाच्या माध्यमातून हा क्लिष्ट विषय सोप्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करूया..