
जगदीप एस. छोकर
विश्व हिंदू परिषदेच्या प्रयागराज येथील विधी विभागाने ८ डिसेंबर २०२४ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या वकील संघटनेच्या कार्यालयीन आवारात समान नागरी संहितेवरील प्रादेशिक अधिवेशन आयोजित केले होते. या वेळी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शेखरकुमार यादव यांनी केलेले भाषण वादग्रस्त ठरले. त्यावर प्रसारमाध्यमांसह समाज माध्यमांत बरीच टीका झाली.
विरोधी पक्षनेत्यांनी या भाषणावर टीका केली अन् सरन्यायाधीशांनी न्या. यादवांवर कारवाईची मागणी केली. सर्वोच्च न्यायालयातील काही अनुभवी ज्येष्ठ वकिलांनीही अशाच आशयाचे पत्र सरन्यायाधीशांना पाठवून ही मागणी लावून धरली. राष्ट्रपतींनाही पत्र लिहून पावले उचलण्याचे आवाहन करण्यात आले आहे...