
Youtube Influencer: हरियाणातील ट्रॅव्हल ब्लॉगर ज्योती मल्होत्रा सध्या चर्चेत आहे. स्वत:ला Nomadic Leo Girl. Wanderer. Haryanvi + Punjabi modern girl with old ideas"काही म्हणवून घेणारी ज्योती सध्या भारतात ओळखली जातेय ती गद्दार म्हणून.
कारण ज्योतीवर आरोप आहेत ते, पाकिस्तानी हेर असल्याचे.
३३ वर्षांच्या ज्योती मल्होत्राने पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आणि ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताची माहिती पाकिस्तानला दिल्याचा आरोप होतोय.
हरियाणातील हिसार येथील पोलिसांच्या हेरगिरीविरोधक पथकाने तिला अटक केलीय. हेरगिरीशी संबंधित प्रकरणातील ही तिसरी अटक आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाकिस्तान दरम्यान झालेल्या सशर्त शस्त्रसंधीनंतर आठवड्याभरात ही अटक झाली आहे.