Premium|Kamlesh Sawant Biography : ‘खाकी’त रंगलेला खरा रंगकर्मी

Kamlesh Sawant Acting Career and Life Story : ‘दृश्यम’मधील इन्स्पेक्टर गायतोंडेच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेल्या कमलेश सावंत यांचा अभिनयप्रवास, रंगभूमीवरील निष्ठा, लालबागशी असलेली नाळ आणि माणुसकी जपणारे व्यक्तिमत्त्व उलगडणारा लेख.
Kamlesh Sawant Biography

Kamlesh Sawant Biography

esakal

Updated on: 

आशिष पाथरे - sakal.avtaran@gmail.com

‘दृश्यम’मधील इन्स्पेक्टर गायतोंडेच्या भूमिकेमुळे घराघरांत पोहोचलेला कमलेश सावंत हा केवळ गुणी अभिनेताच नाही; तर रंगभूमीशी नाळ जोडून ठेवणारा, माणुसकी जपणारा आणि कर्तव्याला कर्तृत्वापेक्षा मोठं मानणारा अवलिया आहे. त्याच्या आयुष्याचा हा कोलाज म्हणजे संघर्ष, निष्ठा आणि निरपेक्ष प्रेमाच्या अनेक टवटवीत फ्रेम्स!

‘मदिरा पीकर सो गये, छी छी छी...’ इन्स्पेक्टर गायतोंडे जेव्हा हे वाक्य बोलतो तेव्हा अख्ख्या थिएटरमध्ये त्याच्या अभिनयाची हव्वा होऊन जाते... लोक बाजूला बसलेल्याला सांगतात, ‘ये बंदा अंडररेटेड है... कमाल का ॲक्टर है!’ त्यांच्या बाजूचा म्हणतो, ‘तू तो ये फिल्म से जानता होगा... मैं तो इसे ‘खाकी’ फिल्म से जानता हूँ. अमिताभ बच्चन को थप्पड लगाया था मालूम? मैं इसको सालों से जानता हूँ’... त्यावरून दोघांमध्ये वाद रंगतो, की कोण त्याला आधीपासून स्क्रीनवर बघतंय. तोच मागून आवाज येतो, ‘‘ये बाबांनो, गबसा... तो लालबागचा आहे. आमच्या एरियातला. त्याला मी लहानपणापासून एक तर स्टेजवर, नाहीतर नाक्यावर बघतोय...’’ दोघं गप्प होतात. लालबागचा माणूस कमलेशच्या नावाने आपली कॉलर टाइट करून बसतो. त्याचवेळी आपलाच सिनेमा पाहायला आलेला कमलेश सावंत मात्र कोपऱ्यातल्या एका सीटवर सवयीने येणाऱ्या झोपेला ‘विजय साळगावकर’ समजून आट्यात घेत असतो आणि त्याची सहचारिणी सपना त्याला जागं ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असते...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com