

Kanya Jhali Ho
esakal
स्त्रीमुक्तीच्या ध्यासाने झपाटलेल्या एका मध्यमवर्गीय महिलेची कथा ‘कन्या झाली हो...’ कादंबरीमध्ये रेखाटण्यात आली आहे. चळवळीत काम करताना तिला करावा लागलेला सर्वंकष संघर्ष, त्यातून घडत गेलेले तिचे कार्यकर्तेपण आणि त्यातून उजळून निघालेले तिचे व्यक्तित्व असा एक स्त्रीवादी चळवळीतील कार्यकर्तीचा लखलखीत जीवनप्रवास कादंबरीत वाचायला मिळतो.