
सुनील चावके, नवी दिल्ली
संसदेच्या महिनाभर चाललेल्या पावसाळी अधिवेशनात पहिल्या मिनिटापासून सुरू झालेला गोंधळ समारोपाच्या शेवटच्या मिनिटापर्यंत कायम राहिला. अधिवेशनाचा समारोप होत असताना लोकसभेत पंतप्रधान मोदी, तर राज्यसभेत गृहमंत्री शहांना ‘इंडिया आघाडी’तील घटक पक्षांच्या नेत्यांच्या उग्र विरोधाला आणि संतप्त घोषणांना सामोरे जावे लागले.
गेल्या ११ वर्षांमध्ये असे प्रथमच घडले. पावसाळी अधिवेशनाच्या समारोपानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमधील दरी आणखीच रुंदावली आहे. येत्या दिवसांत त्याचे तीव्र पडसाद देशाच्या राजकारणात उमटू शकतात