Premium| Journey Behind the Film : आत्मशोधाच्या ‘पावसा’तील गप्पा...

Khandobachya Navane Marathi Film : ‘खंडोबाच्या नावानं...’ चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता आपल्या कलाप्रवासाचा, संघर्षाचा आणि सामाजिक आशय असलेल्या सिनेमामागील प्रेरणेचा आत्मीयतेने घेतलेला हा भावस्पर्शी वेध आहे.
Journey Behind the Film

Journey Behind the Film

esakal

Updated on

डॉ. मिलिंद शिंदे - saptrang@esakal.com

शूटिंगच्या काळात सहकलाकाराबरोबर कधी गप्पा होत असतात. यावेळी एकदा आपण कुठे-कुठे अडलो होतो, त्यातून कशी वाट काढली याची चर्चा झाली. या चर्चेत आपल्याच प्रवासाचा वेध घेतला गेला. बाहेर पाऊस कोसळत असताना हा आत्‍मशोधाचा प्रवास करताना मनातला हा पाऊस वेगळंच काही देऊन गेला...

‘खंडोबाच्या नावानं...?’

हे सिनेमाचं नावय तुझ्या? तू काय आता पौराणिक पिक्चरमध्ये काम करायला लागला काय?

रणजित दाते हा माझ्या मित्राचा भाऊ, जेव्हा मी त्याला माझ्या आगामी सिनेमाचं नाव सांगितलं.

‘खंडोबाच्या नावानं.’ त्यावरची त्याची वरील प्रतिक्रिया... ‘‘पौराणिक पिक्चर नको करू तू. त्या गेटअपमुळं कळत नाही कोण-कोण नट आहेत ते... दाढ्या-मिशांच्या मागे चेहरा लपून जातो. तुला कधी ओळखायचे लोक मग...?’’

नको करूस हे मायथॉलॉजिकल सिनेमे. तसंही मला हे असले विषय आवडतच नाहीत. रणजितचा देव - बीव या गोष्टींवर विश्वास नाही. त्याचे वडील अतिशय देवभक्त होते... त्यांच्या अंतिम क्षणी ते वाचावेत म्हणून त्यानं देवाची खूप विनवणी, प्रार्थना केली. ते काही बचावले नाहीत. त्यांचं देहावसान झालं तो क्षण... रणजितनं देव-देवपण नाकारलं. आत्ताही त्याचा तो नकार टोचत होताच.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com