Premium|Kolahoi Glacier Kashmir : काश्मीरच्या सौंदर्यामागचं संकट; कोलाहोई हिमनदीवर अवलंबून आहे लिडर खोऱ्याचं जीवन

Kolahoi Glacier Water Source : काश्मीरच्या लिडर खोऱ्यातील कोलाहोई हिमनदी सौंदर्य आणि संकटाचा अनोखा संगम आहे; तिच्या वितळत्या बर्फावर स्थानिक पाणी, शेती आणि परिसंस्थेचे भविष्य मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे.
Kolahoi Glacier Kashmir

Kolahoi Glacier Kashmir

esakal

Updated on

उमेश झिरपे - umzirpe@gmail.com

हिमालयातील प्रत्येक प्रदेशाची स्वतःची ओळख आहे. गढवालमध्ये अध्यात्माची छाया आहे, हिमाचलमध्ये रांगडेपणा, तर काश्मीरमध्ये एक नाजूक, हिरवी आणि सौम्य भासणारी दुनिया दिसते. पण या सौंदर्यामागेही हिमालयाचं मूळ स्वरूप तितकंच शक्तिशाली आणि संवेदनशील आहे. काश्मीरमधील कोलाहोई हिमनदी ही याच दोन्ही टोकांना जोडणारी ‘सौंदर्य आणि संकट’ अशी एक महत्त्वाची हिमनदी आहे.

कोलाहोई हिमनदी ही जम्मू-कश्मीरमधील लिडर (Lidder) खोऱ्यात वसलेली आहे. कोलाहोई हिमनदीकडे जाणारा प्रवास हा काश्मीरच्या सौंदर्याचा आणि हिमालयाच्या वास्तवाचा संगम आहे. अरू व्हॅलीपासून सुरू होणारी ही वाट सुरुवातीला हिरव्या कुरणांतून, फुलांनी भरलेल्या बुग्यालमधून आणि शांत जंगलातून जाते. पाण्याचे स्वच्छ प्रवाह, मेंढपाळांची वस्ती आणि दूरवर दिसणारी हिमाच्छादित शिखरं मिळून हे सगळं एक रम्य चित्र तयार करतं.

पण पुढे जाताना दृश्य बदलतं. हिरवाई कमी होते, खडकाळ प्रदेश सुरू होतो आणि शेवटी हिमनदीचा करडा, बर्फमिश्रित भाग दिसू लागतो. हा बदल म्हणजे हिमालयाचं खरं रूप म्हणजे सुंदर पण कठोर. कोलाहोई हिमनदीचा आकार मोठा नाही, पण तिचं महत्त्व वेगळंच आहे. कारण ती काश्मीरच्या पाण्याच्या स्रोतांपैकी एक प्रमुख स्रोत आहे. उन्हाळ्यात जेव्हा हिम वितळतो, तेव्हा लिडर नदीला सतत पाणी मिळतं. यामुळे शेती, पिण्याचं पाणी आणि स्थानिक परिसंस्था टिकून राहते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com