
संतोष मिठारी
नवे उद्योग उभारण्यास उद्योजक तयार आहेत, मात्र जागेची कमतरता असल्याने प्रत्यक्षात त्याबाबतची पावले टाकता आलेली नाहीत. परकी आणि देशांतर्गत गुंतवणुकीचे ११ प्रकल्प सुरू झाले आहेत. मात्र, क्षमतेपेक्षा ही संख्या फारच कमी आहे.
करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे मंदिर, जोतिबा-पन्हाळा आणि फौंड्री हब म्हणून कोल्हापूरला ओळखले जाते. गेल्या ५२ वर्षांत विविध समस्या, आव्हानांचा सामना करत कोल्हापूरने उद्योग क्षेत्रात भरारी घेतली आहे. नावीन्यपूर्ण, कुशल मनुष्यबळ, झोकून देऊन काम करण्याची वृत्ती, उद्योगपूरक वातावरण असल्याने याठिकाणी स्वतःचा उद्योग सुरु करण्यास देशभरातील उद्योजक तयार आहेत.