
कोकण रेल्वे आता नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. यासाठी चार राज्यांची असणारी परवानगीदेखील मिळालेली आहे. कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत समाविष्ट होणार असल्याने गेल्या काही वर्षांपासून निधीच्या कमतरतेमुळे कोकणचा रखडलेला विकासाचा ‘प्रवास’ आता ‘मार्गी’ लागणार आहे. दुहेरीकरण, कोचिंग टर्मिनल, मर्यादित रेल्वे गाड्या हे प्रश्न संपण्याची आशा आहे. कोकण रेल्वे नव्या ‘वळणावर’ येऊन ठेपली असून, त्याचा प्रवास आता सुसाट होणार आहे.