Premium|Konkan Rural Development : कोकणच्या मातीतील प्रेरणादायी यशोगाथा...

Rural Entrepreneurship in Konkan : कोकणातील शिक्षण, ग्रामविकास आणि स्थानिक उद्योजकतेच्या माध्यमातून ग्रामीण भागात उभी राहत असलेली नवी परिवर्तनाची चळवळ तरुणांना गावाशी जोडत आर्थिक आणि सामाजिक विकासाचा नवा मार्ग दाखवत आहे.
Konkan Rural Development

Konkan Rural Development

esakal

Updated on

सुधीर जोगळेकर - sumajo51@gmail.com

कोकणातील माती, माणसं आणि पारंपरिक ज्ञान यांच्यात अजूनही अपरंपार ताकद दडलेली आहे. गरज आहे ती त्या ताकदीला दिशा देणाऱ्या ध्येयवेड्या योजकांची. शिक्षण, ग्रामविकास आणि स्थानिक उत्पादनांच्या माध्यमातून कोकणात शांतपणे उभी राहत असलेली ही नवी उद्योजक चळवळ केवळ आर्थिक परिवर्तन घडवत नाही, तर मातीशी नातं जपण्याची नवी प्रेरणाही देत आहे. चिपळूणमध्ये अनुभवायला मिळालेली अशीच ही एक प्रेरणादायी यशोगाथा...

‘‘असं कोणतंही अक्षर नाही, ज्यापासून मंत्र सुरू होत नाही; अशी कोणतीही वनस्पती वा असं कोणतंही मूळ नाही, ज्यात औषधी गुणधर्म नाहीत; सर्वथा अयोग्य असा कुणी माणूस या जगात नाही. दुर्लभता किंवा आवश्यकता आहे ती योजकांची!’’ असे योजक घडवणारी, निर्माण करणारी, त्यासाठी प्रेरणा देणारी, त्यांच्या मागे अनुभवाचं आणि अर्थकारणाचं बळ उभं करणारी आणि कोकणच्या मातीची महती वाढवणारी जागृती सध्या कोकणात सुरू आहे. अशाच एका जागरणाच्या प्रयोगाला उपस्थित राहण्याचा योग नुकताच चिपळूण शहरात आला आणि त्यातून लक्षात आलेली ही एक यशोगाथा...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com