
cricket technology
esakal
डॉ. दीपक शिकारपूर
deepak@deepakshikarpur.com
कुकाबुरा स्मार्ट बॉल हा एक विशेष बॉल आहे, ज्यामध्ये अत्याधुनिक सेंसर टेक्नॉलॉजी वापरलेली आहे. पारंपरिक बॉलप्रमाणे दिसणारा हा बॉल आतून मात्र अत्यंत तांत्रिक आणि बुद्धिमान आहे. या बॉलमध्ये स्मार्ट चिप्स आणि सेंसर बसवलेले असतात, जे बॉलच्या प्रत्येक हालचालीची माहिती संकलित करतात.
क्रिकेट हा खेळ प्राचीन काळापासून खेळला जात असून, कालांतराने त्यामध्ये अनेक बदल झाले आहेत. एकीकडे खेळाची गती वाढली, तशीच प्रेक्षकांची अपेक्षा आणि निर्णायकतेबाबतची अचूकतादेखील वाढली. या बदलत्या गरजांमुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर क्रिकेटमध्ये वाढू लागला. आजच्या घडीला, क्रिकेट सामन्यांमध्ये तंत्रज्ञानाची भूमिका इतकी महत्त्वाची झाली आहे की, त्याविना अचूक निर्णय, विश्लेषण किंवा प्रेक्षकांना उच्च दर्जाची अनुभूती देणे अशक्यप्राय झाले आहे.