
डॉ. अभिजित मोरे
पुण्यामध्ये एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्यानंतर, राज्यातील आरोग्य व्यवस्था, खासगी-धर्मादाय रुग्णालयांमधील सेवा यांसारख्या प्रश्नांवर चर्चा सुरू झाली आहे. खासगी, धर्मादाय रुग्णालयांमध्ये रुग्णांना उपचार नाकारण्याच्या घटना सारख्याच घडत असतात. मात्र, त्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्यामध्ये सरकार कमी पडते. यामध्ये राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दिसून येतो.