
नीरज हातेकर
Maharashtra Politics : सरकारने लाडकी बहीण योजना सुरुच राहील, असे वचन दिले आहे. हे म्हणजे एखाद्या डॉक्टरने व्हेंटिलेटरवरील रुग्णाला तुझा व्हेंटिलेटर कधीच बंद करणार नाही, असे वचन देण्यासारखे आहे. खरे तर डॉक्टरचे काम रुग्णाची तब्येत सुधारून त्याला घरी पाठवायचे आहे. हे २१०० रूपये काही दीर्घकालीन उत्तर होऊ शकत नाही. मुळात लोकांना पैसे वाटणे हे शासनाचे काम नाही. लोकांना मूलभूत सोयी, स्वतःची उपजीविका सुकरपणे कशी साधता येईल, हे पाहणे हे शासनाचे काम असते. या आघाडीवर राज्य सरकार कसे काम करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.