
हृदयनाथ मंगेशकर
kunteshreeram@gmail.com
‘‘बाळ ! तुला फार छान नाव सुचले आहे. मीरा निसर्गात विलीन होतेय आणि ‘चाला वाही देश’ स्वानंदे, स्वछंदे गातेय. ही विराणीच ध्वनिमुद्रिकेची सांगता, शेवट, समाप्ती.
‘‘हृदय! बेटा! तुला माहीत आहे? तू आत्ता किती आगळा, वेगळा, पण हृद्य, कोमल, विशाल, आकाशपटाहून विशाल, पण बंडखोर, जुन्याला बाजूस सारणारा, पण नव्याचे स्वागत करताना जुन्याची आठव पुसट न होऊ देणारा. अपार्थिव, जाणिवेला नेणीव करणारा, अबोध मनातून उसळी घेणारा, नव्हळीतला भासणारा, पण अतिताचा ‘हुंकार’ तुझ्या या निसर्गात विलीन होणाऱ्या कल्पनेत लवलवतोय, तुकाराम महाराजांना स्वर्गात नेण्यासाठी पुष्पक विमान देहू मुक्कामी उतरले.