
Maratha reservation Hyderabad Gazettee
esakal
उदय वारुंजीकर
एखादी जात किंवा जमातीला विशिष्ट दर्जा मिळणे ही एक मोठी लढाई असते. या लढाईत अनेक चकमकी समाविष्ट असतात. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाबाबत कुणबी नोंदींबाबत १९०९ पासून ‘हैदराबाद गॅझेटियर’चा वापर महाराष्ट्रात करण्याचा निर्णय शासनाने घेतला.
दुर्दैवाने ‘आरक्षण’ हा प्रश्न हा आर्थिक किंवा शैक्षणिक न राहता तो राजकीय बनत चालला आहे. त्यामुळे या विषयाबाबत कायदेविषयक चर्चा न होता त्यावर राजकीय चर्चाच फक्त होते.