Premium|Ranveer Singh FWICE non-cooperation : बंदी की कायदेशीर पेच? सिनेसंघटनांचा ‘असहकार’ आणि बॉलीवूडमधील कामगार शक्तीचे वास्तव

Impact of Cine Worker Strikes on Bollywood Economics : ‘डॉन ३’ चित्रपट सोडल्यामुळे अभिनेता रणवीर सिंगविरोधात 'एफडब्ल्यूआयसीई'ने पुकारलेल्या असहकाराच्या पार्श्वभूमीवर, चित्रपट उद्योगातील कामगार संघटनांची ताकद, कायदेशीर मर्यादा आणि निर्मात्यांच्या आर्थिक नुकसानाचे केलेले अभ्यासपूर्ण विश्लेषण.
Ranveer Singh FWICE non-cooperation

Ranveer Singh FWICE non-cooperation

esakal

Updated on

किशोर अर्जुन

अभिनेता रणवीर सिंगविरोधात ‘एफडब्ल्यूआयसीई’ने जाहीर केलेल्या ‘असहकारा’च्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा भारतीय सिनेउद्योगातील संघटनांची ताकद, त्यांची भूमिका आणि कलाकारांवरील कथित बंदी वा बहिष्काराचा प्रश्न चर्चेत आला आहे. त्या पार्श्वभूमीवर कलाकार, निर्माते आणि कामगार यांच्यातील संबंध, त्यामागील आर्थिक वास्तव आणि अशा निर्णयांचे उद्योगावर होणारे परिणाम काय असू शकतात, हे समजून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.

धुरंधर’च्या दोन्ही भागांना मिळालेल्या अफाट प्रतिसादानंतरही त्या सिनेमाचा नायक अभिनेता रणवीर सिंग त्याच्या कामापेक्षा गेल्या सहा महिन्यांत दोन वेगळ्याच निमित्ताने चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. नोव्हेंबर २०२५ मध्ये ‘इफ्फी’च्या समारोप सोहळ्यात त्याने ‘कांतारा’तील रिषभ शेट्टीने साकारलेल्या भूमिकेचे जाहीर विडंबन करून प्रेक्षक आणि भाविकांचा रोष ओढवून घेतला. त्यासाठी त्याने तेव्हा जाहीर माफीही मागितली आणि त्याचबरोबर अगदी दोन दिवसांपूर्वी म्हैसूरमधील चामुंडेश्वरी मंदिरात जाऊन पूजा करत क्षमायाचना केली. त्याच वेळी दोन दिवसांपूर्वीच ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज’ (एफडब्ल्यूआयसीई) संघटनेने रणवीरविरोधात ‘असहकारा’ची घोषणा केली. एक्सेल एंटरटेन्मेंट निर्मित ‘डॉन ३’ सिनेमातून रणवीर सिंग अगदी ऐनवेळी बाहेर पडल्यामुळे आणि अर्थातच निर्मात्यांचे आर्थिक नुकसान झाल्याची तक्रार दिग्दर्शक फरहान अख्तरने केल्यानंतर ‘एफडब्ल्यूआयसीई’ने आपल्या संलग्न संघटनांना रणवीरशी संबंधित प्रकल्पांमध्ये सहकार्य न करण्याचे निर्देश दिले. अर्थात संघटनेने ही रणवीरवरील ‘बंदी’ नसून त्याच्याविरोधात ‘नॉन कोऑपरेशन डायरेक्टिव्ह’ असल्याचे स्पष्ट केले. अशा वेळी भारतीय सिनेउद्योगात अशा ‘असहकारा’चे स्वरूप, वास्तव आणि परिणाम काय असू शकतात, हे समजून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com