Premium|Child creativity : ‘आई.. बोअर होतंय..!’ असं म्हणणाऱ्या मुलांना काय सांगायचं.? मुलांच्या कंटाळ्यातूनच सर्जनशीलता जन्म घेते का?

Over parenting kills creativity? : मुलाला सतत आखून दिलेल्या चौकटीतून चालायला सांगण्याऐवजी त्यांना स्वत:ला अनुभव घेऊ देणं जास्त गरजेचं असतं
Over parenting kills creativity

Over parenting kills creativity

Esakal

Updated on: 

पुणे - आई.. आज माझ्या कोणत्याच मित्राला सुटी नाहीये.. मी काय करू? मला बोअर होतंय..! आई आज मला करायला काहीच नाहीये तर मी तुझा मोबाईल घेऊ? आई मला खूप कंटाळा आलाय.. मला करमत नाहीये, मी काय करू?

सणावारांदरम्यान, सुटीच्या काळात आमच्या तरी घरात अशी डायलॉगबाजी सतत सुरू असते. मला करायला काहीच नाहीये आणि आता त्याची जबाबदारी ही कशी तुझीच आहे असं काहीसं ‘इमोशन ब्लॅकमेलिंग’ करणाऱ्या मुलांच्या आपणही लगेच पुढे पुढे करून त्याचीही चिंता आपल्याच खांद्यावर घेऊन बसतो.. पण जर असं सातत्याने होत असेल तर कदाचित तुम्ही तुमच्या मुलांमधील सर्जनशीलतेला कुठेतरी ब्रेक लावत आहात.

मुलांना मुलांची जबाबदारी घेऊ देणं, त्यांना त्यांच्या मोकळ्या वेळेचं काय करायचं आहे हे त्यांचं त्यांना ठरवून देणं यात पालक म्हणून अपराधी वाटून घेण्यासारखं काहीच नाही तर त्यामुळे मुलं स्वत: विचार करायला, त्यांचा वेळ सत्कारणी लावायला शिकतात. हे मीच नाही तर अनेक संशोधनं देखील हेच सांगतात. संशोधन सांगतं की, मुलाला सतत आखून दिलेल्या चौकटीतून चालायला सांगण्याऐवजी त्यांना स्वत:ला अनुभव घेऊ देणं जास्त गरजेचं असतं त्यामुळे मेंदूतील 'डिफॉल्ट मोड नेटवर्क' सक्रिय होतं. हा एकूणातच विषय शास्त्रीय दृष्टीकोनातून समजून घेऊया सकाळ+ च्या विशेष लेखातून..

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com