
महेश एलकुंचवार (जन्म ः १९३९) यांचं ‘आत्मकथा’ हे नाटक सप्टेंबर १९८८ मध्ये मुंबईत मंचित झालं होतं. यात श्रीराम लागू, सुहास जोशी, ज्योती सुभाष वगैरे ज्येष्ठांच्या भूमिका होत्या. तेव्हा या नाटकाची फार चर्चा झाली होती. मराठीतील चांगल्या नाटकाचं होतं तसं ‘आत्मकथा’चं झालं. लवकरच या नाटकाचे हिंदी, इंग्रजी आणि इतर भारतीय भाषांत भाषांतर आणि प्रयोग झाले. काही दिवसांपूर्वी मुंबईत ‘आत्मकथा’चा इंग्रजी अवतार बघण्याचा योग आला. एव्हाना १९८८ मध्ये बघितलेल्या मराठी प्रयोगाच्या आठवणी अस्पष्ट झालेल्या आहेत.