

Logic and compassion in human evolution
esakal
माणूस मोठा होण्याचे गुपित हे त्याच्या सामूहिक विकासाच्या संकल्पनेवर आधारलेले आहे. करुणेतून जन्मणाऱ्या सहकार्याशिवाय मानव टिकू शकला नसता. मानवी वंश पुढे नेण्यासाठीसुद्धा करुणा हेच महत्त्वाचे तत्त्व आहे. आपण आपल्या पालकत्वाचा विचार केला तर त्याच्या मुळाशीदेखील करुणा असल्याचे आपल्याला जाणवेल. मानवाचे बाळ जन्माला येते तेव्हा ते अपूर्णावस्थेत असते. त्याच्याविषयी मानवाच्या मनात करुणा नसेल तर त्याला पूर्णत्व प्राप्त होऊच शकले नसते.
मारे पंचवीस-तीस लाख वर्षांपूर्वी उत्क्रांतीच्या प्रक्रियेत मानवी बुद्धिमत्तेचा विकास होत असताना माणसाला तर्क आणि करुणा या दोन अत्यंत महत्त्वाच्या जाणिवांची अनुभूती झाली. या दोन्ही जाणिवा मानवी मेंदूच्या दोन निराळ्या पातळ्यांमधून विकसित झाल्या, असे उत्क्रांतीशास्त्रातले तज्ज्ञ सांगतात. उत्क्रांतीच्या किचकट प्रक्रियेत अत्यंत सावकाशपणे या जाणिवा मानवी जीवनाला अनुकूल होत गेल्या.