

Indian freedom movement
esakal
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी नेतृत्व व्यक्तींपैकी एक असले तरी त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा प्रभाव केवळ राजकीय आंदोलनापुरता मर्यादित नव्हता, तर तो सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक स्तरावरही खोलवर रुजलेला होता. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी (तेव्हाचा बॉम्बे प्रेसिडेन्सी) येथे एका चिंतामणी टिळक व पार्वतीबाई टिळक या चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला.
त्यांचे वडील संस्कृतचे जाणकार आणि शिक्षक असल्यामुळे टिळकांच्या बालपणावर संस्कृत परंपरा, धार्मिक ग्रंथ आणि शास्त्रीय तर्कशुद्धतेचा प्रभाव दिसून येतो. त्यांनी वकील, पत्रकार, तत्त्वज्ञ आणि समाजनेता या अनेक भूमिका बजावल्या. ब्रिटिश राजवटीविरुद्ध त्यांची लढाई साधी विरोधी भावना नसून तो संघटित, तत्त्ववादी आणि दार्शनिक राष्ट्रवाद होता.