
डॉ. मनीष दाभाडे
इस्राईल आणि इराण यांच्यातील संघर्षामध्ये अमेरिकेनेही थेट सहभाग घेतला आणि इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ले केले. त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणाही केली.
तसेच, दोन्ही देशांमध्ये पुढील आठवड्यात चर्चा सुरू होईल, असे जाहीर केले. दोन्ही देशांमधील संबंध साडेचार दशकांमध्ये तणावाचेच राहिले असून, सुसंवादाच्या अनेक संधी निर्माण झाल्या असतानाही त्या गमावल्याने हा संघर्ष झाल्याचे दिसून येते.