

love neuroscience
esakal
आपण प्रेमात पडलो की फक्त मन नाही, तर संपूर्ण मेंदू रसायनांच्या एका अदृश्य वादळात अडकतो. एखाद्या व्यक्तीचा विचार सतत मनात येणं, दिवस-रात्र तिच्याबद्दलच विचार करणं, मेसेजची वाट पाहत हृदयाची धडधड वाढणं हे सगळं केवळ भावना नसून मेंदूतील डोपामिन, ऑक्सिटोसिन, सेरोटोनिन आणि कोर्टिसोलसारख्या शक्तिशाली रसायनांचा खेळ असतो. काही संशोधनांमध्ये असंही आढळून आलं आहे की प्रेमात असताना मेंदूतले तेच भाग सक्रिय होतात जे कोकेनसारख्या व्यसनांमध्ये सक्रिय होतात.
विशेष म्हणजे प्रेमात पडल्यावर मेंदूच्या पेशींचा विकास वेगाने होतो, काही हार्मोन्स माणसाला अक्षरशः वेडं करू शकतात आणि ब्रेकअप झाल्यावर मेंदू व्यसनमुक्तीसाठी झगडत असल्यासारखी लक्षणं दाखवतो. पण असं का होतं? प्रेमाचे वेगवेगळे टप्पे नेमके कोणते? मेंदूमध्ये कोणकोणते भाग सक्रिय होतात? सोशल मिडियामुळे नात्यांवर काय परिणाम होतो? आणि भविष्यात प्रेम औषधांमध्ये बांधून ठेवता येईल का? या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी सकाळ+चा हा संपूर्ण लेख नक्की वाचा.