
Climate warning
esakal
महाराष्ट्राच्या अनेक भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे हवामान बदलाच्या आव्हानाची चर्चा होत आहे. विकासाच्या नावाखाली उद्योग आणि अन्य प्रकल्पांसाठी पर्यावरणाची बेसुमार हानी होत आली आहे. या आव्हानाविरुद्ध वेळीच गांभीर्याने पावले उचलण्याची गरज आहे.
आपली पृथ्वी वर्षानुवर्षे अधिकाधिक तापते आहे. गेली तीन वर्षे ती पूर्वीपेक्षा अधिक तापली होती, याचा स्पष्ट शास्त्रीय पुरावा उपलब्ध आहे. मात्र, पृथ्वी तापल्यावर त्यातून हवापाणी कसे बदलेल, हा मोठा गुंतागुंतीचा प्रश्न आहे. एक निश्चित आहे की आता ‘नेमेची येतो मग पावसाळा’ हे सृष्टीचे कौतुक चालू राहीलच, पण अतोनात पाऊस पडणे किंवा अतिशय कमी पाऊस पडणे यासारख्या टोकाच्या घटना अधिक वारंवार घडू लागतील. यंदाची महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांतील अतिवृष्टी हा याचाच एक भाग असावा.
या अतिवृष्टीमुळे गावागावांत शेतीला, शेतकरी-शेतमजुरांना जबरदस्त फटका बसला आहे. नुसते पिकांचे नुकसान झाले एवढेच नाही, तर वावरातली माती पण वाहून गेली आहे, अनेक विहिरी बुजून गेल्या आहेत; शिवाय घरातील महत्त्वाच्या दस्तावेजांसहीत सगळी मालमत्ता पाण्यात गेली आहे. शासनाने दोन हजार २१५ कोटी रुपये मदत मंजूर केली आहे. याचाच अर्थ नुकसान काही कोटी रुपयांचेच धरण्यात आले आहे. मात्र वास्तवातील नुकसान हजारो कोटी रुपयांचे असू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अठरा लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असेल आणि प्रतिहेक्टरी नुकसान दहा ते वीस हजार रुपये असेल, तर एकूण नुकसान १७८ हजार कोटी रुपये असेल. प्रतिहेक्टरी नुकसान आणखीच जास्त असेल, तर हे आकडे दोन ते पाच लाख कोटी रुपयांपर्यंत पोचतील. मग हे शेतीचे नुकसान महाराष्ट्राच्या एकूण उत्पन्नाच्या ०.१ टक्क्यापर्यंत भरेल. जोडीलाच पाणीपुरवठा आणि इतर मूलभूत सुविधा विचारात घेता यंदाचे शेतीशी संबंधित नुकसान नक्कीच लक्षणीय आहे.
Human intervention in nature
esakal