Premium|Auto Retail in Maharashtra : महाराष्ट्रातील ऑटो रिटेल क्षेत्र गावागावात कसे पोहोचले?स्थानिक रोजगार आणि बदलती ग्राहक संस्कृती

Automobile Dealer Network : महाराष्ट्रातील ऑटो रिटेल क्षेत्र गाव-पातळीपर्यंत विस्तारल्याने वाहन खरेदी, सर्व्हिसिंग, विमा आणि फायनान्स सुविधा ग्राहकांच्या जवळ पोहोचल्या असून, स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत.
Auto Retail in Maharashtra

Auto Retail in Maharashtra

esakal

Updated on

सचिन महाजन, अध्यक्ष, फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन, महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या ‘ऑटो रिटेल’ (वाहन खरेदी-विक्री) क्षेत्राने आज थेट गाव-पातळीपर्यंत मजल मारली आहे. वाढते डीलर नेटवर्क, डिजिटल सेवा आणि सुलभ अर्थसाह्यामुळे ही अक्षरशः बहरली आहे. या विस्तारामुळे केवळ गाड्यांची विक्रीच वाढली नाही, तर सर्व्हिसिंग, विमा, फायनान्ससारख्या पूरक व्यवसायांमधून स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या लाखो नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. राज्यातील याच ऑटो रिटेल क्रांतीचा आणि रोजगारवाढीचा वेध घेणारा हा विशेष लेख...

स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काही काळापर्यंत वाहन व्यवसायाची व्याप्ती मर्यादित होती. ग्राहकांना वाहन खरेदी किंवा सर्व्हिसिंगसाठी जिल्ह्यांच्या ठिकाणी जावे लागत असे. आज परिस्थिती बदलली आहे. तालुका पातळीवर आणि गावोगावी डीलरशिप, सब-डीलर नेटवर्क आणि सेवा केंद्रे उभी राहिली आहेत. पूर्वी एका व्यक्तीकडे किंवा समूहाकडे अनेक जिल्ह्यांतील डीलरशिप असण्याचे प्रमाण अधिक होते. आता एका ब्रँडच्या अनेक डीलरशिप वेगवेगळ्या भागांमध्ये देण्यात येतात. त्यामुळे ग्राहकाला घराजवळच वाहन खरेदी, सर्व्हिसिंग आणि इतर सुविधा उपलब्ध होताना दिसत आहेत. या विस्ताराचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे स्थानिक रोजगारनिर्मिती. परिणामी रोजगारासाठी स्थलांतर करण्याची गरज कमी होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com