

Maharashtra’s Economic Strength and Future Growth Potential
E sakal
डॉ. अशोक कुडले, ( अर्थशास्त्राचे अभ्यासक )
आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या आयातशुल्कामुळे व्यापारयुद्ध भडकले आहे. आयातशुल्कासंदर्भातील अनिश्चित व सतत बदलणाऱ्या धोरणामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. याचा फटका भारतासह अनेक देशांना बसला आहे. वाढीव आयातशुल्कामुळे मुख्यत्वे अभियांत्रिकी व वाहनउद्योगांना फटका बसला असून माहिती तंत्रज्ञानासारख्या प्रमुख उद्योगांची निर्यात बाधित होऊ शकते. याचा फटका देशाच्या एकूण निर्यातीत १६.६ टक्के हिस्सा असणाऱ्या महाराष्ट्रातील उद्योगांनाही बसला आहे. याचा नकारात्मक परिणाम महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर होऊ नये, या दृष्टीने धोरणात काही बदल करावे लागतील.