
आपला देश कृषीप्रधान आहे पण देशातील जनतेच्या तोंडी घास देणारा शेतकरी मात्र अजूनही विकासापासून दूरच आहे, असं दिसतंय. इतकंच नव्हे तर आजही शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण कमी झालेलं नाही. उलट २०२५च्या पहिल्या तिमाहीत तब्बल ७६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं उघड झालं आहे.
जानेवारी ते मार्च या पहिल्या तीन महिन्यांमध्ये महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य सरकारने मंगळवारी विधानसभेत दिली. या शेतकऱ्यांपैकी मराठवाडा आणि विदर्भातील प्रमाण जास्त आहे.