
Maharashtra crop damage compensation
esakal
अनिल जाधव
अतिवृष्टीने राज्यात आतापर्यंत तब्बल ५० लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार नाही. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे हेक्टरी लाखभर रुपये नुकसान होत आहे; पण या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना केवळ निविष्ठा अनुदान म्हणून ८५०० रुपये मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन हेक्टरी ५० हजार रुपये मदत देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना मदत केली तरच रब्बीची लागवड करता येईल, अशी परिस्थिती राज्यातील अनेक शेतकऱ्यांची झाली आहे.
अतिवृष्टीने यंदा गाव शिवारात चांगलाच धुमाकूळ घातला. ऑगस्टअखेरपर्यंत २८ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आणि मदतीसाठी शासनाने अहवाल पाठवला आहे. सरकारच्या पंचनाम्यानुसार जवळपास ३७ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. ऑगस्ट महिन्यातच २४ लाख हेक्टरला अतिवृष्टीचा फटका बसला.