
दिनकर जाधव
यंदा मॉन्सूनचे राज्यात लवकर आगमन झाले आहे. त्यामुळे पाण्याची स्थिती चांगली असली, तरीही पेरणीच्या कामांसाठी शेतकऱ्यांची गडबड उडाली आहे. मागील हंगामामध्ये सोयाबीनसारख्या पिकांना चांगला भाव मिळाला नव्हता. त्याचा परिणाम यंदाच्या पेरण्यांवर होणार आहे, असे दिसून येते. अन्नदाता सुखी असेल, तरच तुम्ही आम्ही सुखी होऊ, हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे.
चालू वर्षी हवामान शास्त्रज्ञांनी महाराष्ट्रामध्ये १०६ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केलेला आहे. मोसमी पावसाचे आगमन सरासरीपेक्षा एक आठवडा अगोदर झालेले आहे.