
पांडुरंग म्हस्के
देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी त्यांच्या राज्यांतील भेटीच्या वेळी सन्मानाचे काही नियम असतात. त्यांना कोणत्या व कशा प्रकारचा सन्मान राज्य सरकारकडून मिळावा. त्यांच्या राहण्याची खाण्याची आणि सुरक्षेची जबाबदारी संबंधित राज्य सरकारची असते. त्यासाठी राज्य सरकारने सरकारच्या धर्तीवर काही नियम बनवले आहेत.
मात्र राज्य सरकारकडे राज्याचे स्वतःचे असे काही राजशिष्टाचार मार्गदर्शक पुस्तिका (मॅन्युएल) असे काही नाही. तसे केवळ नियम आहेत आणि केंद्र सरकारच्या नियमानुसार हे सन्मान संबंधित अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना दिले जातात.