
मुंबई : महाराष्ट्राच्या शिक्षक भरतीमध्ये होणारा भ्रष्टाचार हा नेहमीच सरकारचं डोकं दुखी ठरलेला विषय आहे. परंतु, आता मात्र उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या घोषणेनंतर शिक्षक भरतीच्या प्रकियेत पारदर्शकता येईल अशी चिन्हे दिसत आहेत. सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक पदांसाठी होणाऱ्या निवड प्रक्रियेचे दृकश्राव्य चित्रीकरण करून त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी निकाल लावणे बंधनकारक झाले आहे.
नविन शिक्षक भरतीची प्रक्रिया कशी असेल? शिक्षकांच्या मुल्यमापनाचे आधार काय असतील? खरंच हा निर्णय यशस्वी होऊ शकेल का? अनेक दिवसापासून रखडलेल्या प्राध्यापक भरती प्रक्रियेवर या निर्णयाचा काय परिणाम होईल? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया सकाळ प्लसच्या या विशेष लेखातून.