

Maharashtra development
esakal
विकसित महाराष्ट्र २०४७’ या दस्तऐवजाला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने २८ ऑक्टोबर रोजी मान्यता दिली. महाराष्ट्राची पुढच्या दोन दशकांची विकासाची वाटचाल या दस्तऐवजात आहे. विकासाचा चेहरा, भूमिका आणि लक्ष्य या दस्तऐवजाने निश्चित केले आहे. ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ हे त्या आग्रहाचे नियोजनाच्या दस्तऐवजात झालेले रूपांतर आहे. म्हणूनच ‘विकसित महाराष्ट्र विकसित भारतासाठी’ असे महाराष्ट्राच्या दस्तऐवजाचे घोषवाक्य आहे.
महाराष्ट्र राज्य स्थापनेला साडे सहा दशके झाली आहेत. भारतीय प्रजासत्ताकाची पंच्चाहत्तरी झाली आहे. देश स्वतंत्र होऊन ७८ वर्षे झाली आहेत. देशाच्या स्वातंत्र्याची शताब्दीकडे होणारी वाटचाल सुनियोजित असावी, म्हणून केंद्र सरकारने २०२३ मध्ये अभियानाची घोषणा केली. ‘विकसित भारत २०४७’ असे या अभियानाचे नाव. त्याच धर्तीवर राज्यांनी विकासाचा संकल्प करावा, नियोजन करावे अशी केंद्राची अपेक्षा.