Premium|Maharashtra Single women Day Special : ‘एकल’ महिलांसाठी धोरण ठरवणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य..! हे धोरण नेमकं काय आणि का.? हेरंब कुलकर्णी यांची सविस्तर मुलाखत

Heramb Kulkarni Interview : आज एकल महिला दिवस त्यानिमित्ताने कोविडपासून सुरू झालेली ही चळवळ धोरणापर्यंत कशी पोहोचली, जाणून घेऊया सकाळ+ या विशेष लेखातून..
Single women policy Maharashtra

Single women policy Maharashtra

Esakal

Updated on

Single Women policy maharashtra : Heramb Kulkarni Interview

पुणे - कोविड काळात अनेक महिला विधवा झाल्या.. अनेक मुलं अनाथ झाली.. कित्येक कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त झाली. याच काळात या विधवा महिलांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी अर्ज भरायला मदत करत असताना या एकूणातच प्रकाराची भीषणता कळाली आणि महाराष्ट्रात सुरू झाली एकल महिलांच्या प्रश्नावर काम करणाऱ्यांची चळवळ. हेरंब कुलकर्णी यांच्या प्रयत्नातून सुरू झालेल्या या चळवळीला आता सरकारी धोरणाच्या रूपानं मूर्त रूप मिळणार आहे आणि महाराष्ट्रात पहिल्यांदाच एकल महिला धोरण ठरविले जाणार आहे.

पण हा प्रवास सोपा नव्हता. एकल महिला म्हणजे काय.? यापासून हा प्रवास सुरू झाला होता. खेडोपाड्यात, रानावनात राहणाऱ्या महिलांना एकत्र आणणं, त्यांना जो त्रास होतोय त्याची त्यांनाच जाणीव करून देणे, त्यांना त्याविषयी बोलतं करणं आणि त्यांना संघटीत करून त्यांच्या प्रश्नावर काम करणं हा मोठा प्रवास महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्ते हे सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्या मदतीने करत आहेत. आणि सरकारनेही आता याला हात दिला आहे. २३ जून हा तसा  ‘जागतिक विधवा दिन’ म्हणून पाळण्यात येतो. पण महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री यांनी नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार हा दिवस आता ‘एकल महिला दिवस’ म्हणून पाळण्यात येणार आहे. आजच्या या दिनाच्या निमित्ताने या एकूणातच प्रश्नावर काम करणाऱ्या हेरंब कुलकर्णी यांची सविस्तर मुलाखत वाचूया सकाळ+ च्या लेखात..

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com