
महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेत सांगितले की, महाराष्ट्रातल्या एसएससीच्या शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्नचा अभ्यासक्रम आगामी शैक्षणिक वर्षात लागू करणार असं सांगितलं आणि एकच खळबळ उडाली.
त्यातच यंदा शासनाने त्यांच्या पॅट (periodic assessment test) परीक्षेची तारीख लांबवल्याने आता राज्य सरकार स्टेट बोर्ड बहुतेक रद्दीतच काढणार, असा अनेक पालकांचा समज झाला.
आता आपल्या मुलाचं काय होणार, त्यांना नव्या अभ्यासक्रमाशी जमवून घ्यायला जमणार का? त्यांना शिकवण्यासाठी तितके शिक्षित शिक्षक असणार का, त्यांना ते जमेल का, मग माझ्या मुलाच्या शाळेची फी वाढणार का, असे एक ना अनेक प्रश्न पालकांच्या मनात आले आहेत. त्यांची उत्तरं मिळवण्यासाठी वाचा, सकाळ प्लसचा हा लेख.