NDRF criteria change

NDRF criteria change

esakal

Premium| NDRF criteria change: शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून सरकार केंद्राकडे ‘एनडीआरएफ’ निकष बदलाची मागणी करणार आहे. पूरग्रस्तांना तत्काळ मदत आणि पुनर्वसनावरही भर

Maharashtra flood relief: अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीच्या पार्श्वभूमीवर सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. ‘एनडीआरएफ’ निकष बदल, डिजिटल पंचनामे, थेट भरपाई, आणि पुनर्वसनाला गती देण्यासाठी ठोस निर्णय घेतले जात आहेत
Published on

राज्यातील शेतकऱ्यांसाठी यंदाचा खरीप हंगाम अतिशय कठीण ठरला आहे. मुसळधार पाऊस, नद्यांचे पूर आणि अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टरवरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पाऊस नसतानाही नदीच्या खोऱ्यातून अचानक आलेल्या महापुराने शेती वाहून गेली. अनेक घरांचे, गोठ्यांचे, विहिरींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहेत. अशा पार्श्वभूमीवर, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी ‘सरकारनामा’चे प्रतिनिधी सदानंद पाटील यांच्याशी सविस्तर संवाद साधला.

राज्यात सध्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी तुमचा आश्वासक संदेश काय आहे?

सरकार या संकटकाळात शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतांचे, घरांचे, गोठ्यांचे; तसेच दगावलेल्या पशुधनाचे पंचनामे वेळेत पूर्ण केले जात आहेत. या महापुरामुळे जीवनावश्यक वस्तू, कपडे, संसारोपयोगी साहित्य आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अन्नधान्य वाहून गेले आहे. म्हणूनच सर्व बाधित कुटुंबांना तत्काळ अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. नियम-निकष बाजूला सारून, झालेल्या नुकसानीची शक्य तितकी भरपाई करण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. हे केवळ कागदोपत्री आश्वासन नाही, तर प्रत्यक्षात अंमलबजावणी होईल, याची खात्री देतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com