

Market Reforms in Maharashtra
esakal
महाराष्ट्राचा शेतकरी हा जगातील सर्वोत्तम उत्पादक आहे. आता त्याला योग्य बाजारपेठ आणि भाव मिळवून देणे हे आमचे कर्तव्य आहे. आधुनिक पायाभूत सुविधा, डिजिटल व्यवहार, प्रक्रिया उद्योग आणि जागतिक बाजारपेठेत शेतमाल पोहोचवण्यासाठी जलदपुरवठा साखळी व संपर्क या दृष्टीने नियोजन करून आम्ही राज्याच्या कृषी विपणन व्यवस्थेला नवे बळ देत आहोत.”
राज्यात ३०५ कृषी उत्पन्न बाजार समित्या, तसेच ६२५ उपबाजार आवार; तर खासगी बाजार ८४ ठिकाणी निर्माण करण्यात आले आहेत. या समित्यांमध्ये खरेदी-विक्रीचे सर्व व्यवहार ऑनलाइन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या ठिकाणचे व्यवहार पारदर्शक नसतील तर खासगी बाजारांचे परवाने रद्द केले जातील. तर सरकारी बाजार समित्यांवरही कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही, अशी भूमिका पणनमंत्री जयकुमार रावल यांनी ‘सरकारनामा’चे प्रतिनिधी सदानंद पाटील यांच्याशी बोलताना मांडली.