
महेश कोठारे
editor@esakal.com
‘धूमधडाका’, ‘दे दणादण’ आणि ‘थरथराट’ हे माझे चित्रपट प्रचंड यशस्वी ठरले. त्यामुळे चौथा चित्रपट काय करावा, हा विचार मनात आला. त्याचं उत्तर एकच होतं, मराठीत काहीतरी भव्यदिव्य करायचं ! त्या काळात सर्व मराठी चित्रपट ३५ एमएममध्ये बनायचे; पण सिनेमास्कोपमध्ये चित्रपट कुणीच बनवलेला नव्हता. मी अनेकांना विचारलं की मराठीत सिनेमास्कोप चित्रपट का नाही ? उत्तर मिळालं, की ज्या ठिकाणी मराठी सिनेमे प्रदर्शित होतात, तिथे सिनेमास्कोप स्क्रीन्सच उपलब्ध नाहीत.