
व्यावसायात नाव, नंबर्स, ब्रँड लोगो, रंग आदी सर्व बरंच बारकाईने पाहिले जाते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ब्रँड नेहमीच क्वालिटीसह या सर्व गोष्टींवरही प्रचंड काम करत असतात. पण, बाजारात एकसारख्या रंगाचे, लोगो असलेले पदार्थ आले की ग्राहकांचा गोंधळ उडतो. त्यामुळेच प्रत्येक ब्रँड त्यांच्या उत्पादनाची नाव, नंबर्स, लोगो, रंग आदींची नोंदणी करत असते. पण, दोन वेगवेगळ्या क्षेत्रातील कंपन्यांनी एकसारखाच नंबर किंवा कोड वापरला तर काय होईल? हा प्रश्न समोर येण्याचं कारण म्हणजे IndiGo vs Mahindra यांच्यातला सध्या सुरू असलेला वाद...