
सुरेंद्र पाटसकर
एक वर्ग जिथे ‘हुशार’ व ‘ढ’ असा किंवा पुढच्या व मागच्या बाकावरील विद्यार्थी असा भेद नाही. सर्व जण एकमेकांच्या शेजारी व एकाच समान पातळीवर असतील, वर्गातील प्रत्येक कृतीमध्ये सर्वांना संधी मिळेल, शिक्षकांनाही सर्वांकडे एकाच वेळी लक्ष देणे शक्य होईल, अशा प्रकारच्या बैठक रचनेचा प्रयोग केरळमध्ये साकारला आहे. त्याची दखल आता देशातील इतर राज्यांनीही घेतली आहे ...
केरळातील शाळांनी एक अभिनव तसेच जुन्या आठवणी जागवणारा निर्णय घेतला आहे. खोडकरपणाशी जोडली गेलेली पारंपरिक ‘बॅकबेंच’ व्यवस्था, आता हळूहळू संपुष्टात आणली जात आहे. त्या जागी नवी आसनव्यवस्था काही शाळांनी प्रत्यक्षात आणली आहे. या व्यवस्थेमध्ये शिक्षक मुलांच्यामध्ये उभे राहून शिकवतील. त्यांच्या बाजूने इंग्रजी अक्षर ‘यू’ किंवा ‘व्ही’ प्रमाणे मुलांची बसण्याची व्यवस्था असेल.