
How do scuba divers help clean ocean in Maharashtra
स्टॅलिन दयानंद
आपले आयुष्य अधिक सुखकर आणि सहजसोपे करण्यात विज्ञानाने मोठी भूमिका बजावली आहे; परंतु जीवनमान सोपे करण्याच्या प्रयत्नात दुसरीकडे आपली वाटचाल विनाशाकडे चालली आहे, याचे भान मात्र आपल्याला राहिलेले नाही. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे प्लॅस्टिकचा शोध आणि त्याचा आता जगभरात झालेला विस्फोट. जसे आपल्याकडे म्हणतात, की शेवटी आपल्याला वरच जायचे आहे, त्यानुसार आपल्या घरातून बाहेर पडलेल्या कचऱ्यातील प्लॅस्टिकचा एखादा तुकडा रस्त्यावर, पुढे नाला, नदी असा वाहत जात शेवटी समुद्राला जाऊन मिळतो. म्हणजे समुद्र हा टाकाऊ पदार्थांसाठी जणू अखेरचे ठिकाण झाले आहे; पण कधी विचार केला का जगभरातून असे किती प्लॅस्टिक समुद्रात येत असेल? एकवेळ आपले घर, आपला गाव, आपला देश स्वच्छ करता येईल; पण विस्तीर्ण असा समुद्र कोण स्वच्छ करेल? आपल्या डोक्यात हा विचार आला असेल किंवा नसेल; पण या जगात काही ध्येयवादी लोकं हे अतुलनीय काम करताहेत.